A Promise

Posted: September 3, 2011 in English, Expressions
Tags: , ,

Me and My daughter...

You are part of me and you will always remain
I am part of you and I will always remain

I will never miss you just because I am physically away
Because you are and you will always remain a part of me

Whenever you need me just think of me, and you will find me around
Because I am and I will always remain a part of you

Twilights…

Posted: August 18, 2011 in English, Expressions
Tags: , ,

Twilights…

Have you ever woken up during twilights…
Sensed the feeling of being lost…
I have…
And I am scared… I am scared of waking up in twilights…
Twilights are beautiful… calm and serene…
But do you know what is after the twilight…
Is it a bright day or a dark night…
Is it a hot sunny day or a milky full moon night…
I am not scared of a dark night or a hot sunny day…
I am scared of uncertainty…
I am restless during those twilight hours…
Waiting for dawn or dusk…

I am…

Posted: August 17, 2011 in Expressions

I am… because you are…
I reflect you… and you reflect me…
I think you are bad… because I am…
You think I am good… because you are…

This is all about how our thoughts reflect ourselves… If we perceive something about someone, we think that other person is like that… but somewhere it is reflection of what we are and not what the other person is…

तो बाहेर… ती आत…
प्रसृतीकक्षाचा लाल दिवा पेटलेला…
तो प्रतिक्षाकक्षात अस्वस्थपणे फेर्‍या घालतोय…
काहीवेळा पुर्वीची हुरहुर आता चिंतेत परावर्तित झालेली…
तिच्या आवाजाचे, हातावर घट्ट होणार्‍या पकडीचे भास त्याला होऊ लागले…
सह-अनुभूतीच्या जाणीवेने त्यालाही आता प्रसववेदना जाणवू लागल्या…
पण याच बरोबर एक अनामिक भावना तो अनुभवत होता..
नक्की काय ते सांगता येत नव्हते… पण तरिही…

जस-जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता,
त्याच्या प्रसव-सह-अनुभूतीच्या वेदना वाढलेल्या…
त्याच बरोबर ती अनामिक भावनादेखील बळावलेली…
वाढलेल्या रक्तदाबामुळे कपाळावर घाम आला आहे की
रक्तदाब कमी झाल्यामुळे तळहात घामेजला आहे ते त्याला कळेना…
त्याच्या फेर्‍यांची गती आता वाढलेली…

आणि इतक्यात प्रसृतीकक्षाचा लाल दिवा बंद झाला..
एकाच वेळी प्राण डोळ्यात आणि कानात आणून तो दरवाजाकडे पाहू लागला…
डॉक्टर बाहेर आले… म्हणाले “अभिनंदन…………..”
आतून येणार्‍या “क्यॅह… क्यॅह…” च्या आवाजात पुढचे शब्द त्याच्या पर्यत पोहचलेच नाहीत…
कपाळावरचा आणि हाताचा घाम जाऊन डोळ्यातून दोन मोती घरंगळले…
आता त्याला त्याच्या जाणिवांची नीट ओळख होऊ लागली…

….. हं चला… बाप जन्माला आला!!!

सिंगापूरमधील फुडकोर्ट्स… माणसांची सतत वर्दळ… नाना प्रकारची माणसं… गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, देसी-परदेसी असा कोणताही भेदभाव नाही. मला या वर्दळीचे, गर्दी मधले चेहरे वाचण्याचे व्यसन आहे. मी सिंगापूरला नवीन होतो तेंव्हा मोकळ्या वेळात फुडकोर्ट मधे एखादा ते-सी इति टी विथ क्रीम… म्हणजे चहा घेऊन बराच वेळ गर्दीत चेहरे वाचण्यात वेळ घालवित असे. त्या फुडकोर्ट्ची बद्दल थोडसं…

“हे रॉब, इज फुंग यी जॉयनींग अस फॉर लंच?”… ह्या वाक्यातील रॉब हा आमचा रिजनल हेड, फुंग यी ही रिसेप्शनीस्ट आणि मी रिजनल कन्सल्टंट. रॉब हा जन्माने बेल्जियन आणि नागरिकत्वाने अमेरिकन, फुंग यी ही जन्माने चायनीस आणि नागरिकत्वाने सिंगापूरी, आणि मी जन्माने आणि नागरिकत्वाने भारतीय.

“येस. शी इज” रॉब उत्तरला, “प्लीज गो अहेड अँड गेट युअर फुड”.

“आय अ‍ॅम हॅवींग तेपनयाकी, हाऊ अबाऊट यू?” मी विचारले.

“अं… आय विल हॅव कोरियन टुडे” रॉब.

“रॉब यु अल्सो गेट युअर फुड, आय गॉट नासी बिर्यानी फॉर माय सेल्फ” फुंग यी रॉब च्या शेजारी पर्स ठेवत म्हणाली.

“थॅंक्स फुंग यी. डू यू वॉंट एनी ड्रिंक्स” मी फुंग यी ला विचारले.

“गेट मी एनी थिंग” फुंग यी चे उत्तर

“बांडूंग कॅन” तीचे उत्तर माहीत असून ही तिला चिडविण्यासाठी मी विचारले.

“नो लाह… कॅनॉट ले… आय ऑरेड्डी ओवरवेट बाय अ पाउंड” रॉब तिच्या सिंग्लीश भाषेची नक्कल करत म्हणाला.

“सी.. रॉब नोज एवरी थिंग.” फुंग यी तिचे चपटे नाक फुगवीत म्हणाली, “गेट मी होम मेड…”

“ओके… ओके… आय विल गेट युवर रेग्युलर आईस लेमन टी” तिचे वाक्य पूर्ण करत मी आणि रॉब आपापल्या स्टॉलच्या दिशेने रवाना झालो.

(तेपनयाकी: जापानी खाद्यप्रकार, नासी बिर्यानी: आपल्याकडे मिळणार्‍या चिकन बिर्यानीची सिंगापूरी बहीण, बांडूग: रुहअफ्जा सारखा गुलाबाचा सिरप आणि दुध यांचे पेय”)

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या “ऋतुगंध” या द्वैमासिकाच्या वसंत अंकात पुर्वप्रकाशित. ऋतुगंध – वसंत वाचण्यासाठी क्लिक करा:

विशाल नुकताच सिंगापूरला आला होता. त्याची राहण्याची सोय होई पर्यंत तो माझ्याकडे राहणार होता. त्याचे ऑफिसही माझ्या ऑफीसच्या शेजारच्या इमारतीमधे असल्यामुळे सकाळी आम्ही एकत्रच ऑफीसला गेलो. आधीच ठरल्या प्रमाणे मी त्याला दुपारी फुडकोर्ट जवळ भेटलो. विशाल सिंगापूरला येण्याआधी पासूनच त्याला माझे फुडकोर्ट बद्दलचे प्रेम माहीत होते. ऎकीव वर्णन कितीही माहीत असले तरी फुडकोर्ट बघण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव होता.

फुडकोर्ट मधे शिरताच नकळतच विशालचा हात नाकाजवळ गेला. रोस्टेड डिलाईटच्या स्टॉलवर टांगलेले रोस्टेड चिकन आणि डक टांगलेले पाहून विशालने माझ्या कडे डोळे विस्फारून पाहिले. तसे त्याने गावी कसायाच्या दुकानात टांगलेले बोकड पाहिले होते पण ते लांबूनच. मला त्याच्या चेहर्‍यावर माझा भूतकाळ दिसत होता आणि मला हे ही माहीत होते की “soon he is going to be fine and get used to food-court”

त्याचा आज पहिलाच दिवस असल्यामुळे मी विशालला भारतीय स्टॉलवर घेऊन गेलो. ओळखीचे खाद्यप्रकार पाहून आणि खाद्यगंध हुंगून विशालला हायसे वाटले. भाजून टांगलेले पक्षीगण पाहून विशालची अभक्ष्य भक्षणाची इच्छा उडाली होती म्हणून त्याने शाकाहारी जेवण घेतले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागला. पण आसपासच्या टेबलांवर टिश्यू किंवा वर्तमानपत्र रूपी “जागा पकडण्यासाठी टाकलेले रूमाल” पाहून त्याचे डोळे विस्फारले. त्याने मला नजरेनेच “इथे ही?” विचारले. माझे जेवण घेताघेता मी त्याला मानेनेच “मग काय!!” असे म्हणत पलिकडे रिकामी असलेले टेबल दाखविले. अनरिझर्वड टेबल बघताच विशालने दोन रिझर्वड टेबलांच्या मधून सूर मारून टेबल अडविले आणि एका विजेत्याच्या आवेशात त्याने माझ्याकडे पाहिले. मी हसून त्याच्या विजयाला दाद दिली आणि त्याच्या बरोबर जाऊन जेवायला बसलो.

जेवता जेवता विशालने फुडकोर्टबद्दलची प्रश्नावळी माझ्यासमोर मांडली. “इथे लोक डबे आणत नाहीत का?”, “हे लोक चॉपस्टीक ने कसे जेवतात?” “इतक्या वासात तुम्ही कसे जेवता?”, “फुडकोर्ट कोण चालवतं?”, “स्टॉल भाड्याने कसे मिळतात?” इत्यादी इत्यादी. मी दिलेली उत्तरे तोंडी लावत विशालने जेवण संपविले. लंच टाईमही संपत आला होता. विशालचे जेवण संपताच त्याने टेबलावर पडलेले अन्न टिश्यूने उचलून ट्रे मधे टाकले आणि त्याने मला विचारले ट्रे बे कुठे आहे. माझ्या चेहर्‍यावर छापलेला प्रश्न वाचून त्याने टेबलावर चिटकवलेल्या स्टीकर कडे माझे लक्ष वेधले. “बी ग्रेशीअस… कीप युअर ट्रे अ‍ॅट ट्रे बे”.

तो ट्रे घेउन उठणार इतक्यात टेबल साफ करणारी आजी आली आणि त्याच्या हातातला ट्रे घेऊ लागली. त्या आजीचा थरथरणारा हात पाहून विशाल तिला म्हणाला, “इट्स ओके आंटी… आय वी कीप माय ट्रे अ‍ॅट ट्रे बे.” तो ट्रे देत नाहीये हे बघून ती आजी त्याच्या अंगावर “चायनीस-सिंग्लीश” मधे खेकसली आणि तिने तो ट्रे हिसकावून घेतला. तिचे ते अवसान बघून विशालचा चेहरा कसानुसा झाला आणि तो “घडला काय गुन्हा?” अशा नजरेने माझ्याकडे पाहू लागला. त्याचा ट्रे तिच्या भांडी गोळा करायच्या गाडीत टाकून तिने मोर्चा माझ्या ट्रे कडे वळविला. मी माझा ट्रे तिच्या हातात उचलून दिला आणि तिचे आभार मानले. ती अजूनही स्वतःशी पुटपूटत निघून गेली.

“अरे ती बाई तुझ्या आजी पेक्षाही जास्त वयाची आहे. तिला कसे तुम्ही तुमचे उष्टे ताट उचलायला लावता? ती निघून जाताच विशाल बरसला.

“मित्रा मला कळते आहे तुझी चिडचिड… पण जरा विचार कर.. ती आजी इथे ताशी ५-६ डॉलर पगारावर काम करते. दिवस भरात तिला जे काही ३०-३५ डॉलर मिळतात त्यात तिचा उदरर्निवाह होतो. जर आपण सगळ्यांनी जर आपापली ताट उचलूने ठेवली तर या फूडकोर्टला तिची गरज उरणार नाही. आणि तसे झाले तर तिचे जगणे अजून कठीण होऊन बसेल…” मी त्याला समजावणीच्या सुरात सांगितले.

“पण ह्या इतक्या वयाच्या लोकांना ही असली कामं करावी का लागतात? ह्यांच्या घरचे लोक ह्यांचा संभाळ का करत नाहीत? की हे सगळे लोक अनाथ आहेत?” पुन्हा एकदा विशालच्या प्रश्नांची सरबत्ती.

“राजे तुम्ही आत्ताच सिंगापूर मधे आला आहात. इथले सोशिओ-इकॉनॉमिक प्रॉबलेम्स वेगळे आहेत. ते समजून घ्यायला थोडासा वेळ द्यावा लागेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेव. जो पर्यंत तुमचे हात चालू आहेत तो पर्यंतच तुम्ही इथे जगू शकता. तुमचे हात थांबले की तुमचे उत्पन्न थांबते. आणि उत्पन्न थांबले की पर्यायाने तुम्ही थांबता.” मागील तीन वर्षात मला उमगलेले सर्वसामान्य सिंगापूरी माणसाचे जगण्याचे तत्व‍ज्ञान त्याला सांगण्याचा (पर्यायाने स्वतःला परत सांगण्याचा) माझा प्रयत्न…

“हे बरोबर आहे का? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे ही नाहीये. पण आहे हे असे आहे हे लक्षात घे.” त्याच्या अपेक्षीत प्रश्नाचे उत्तर आधीच देऊन मी तो त्याचा बरोबरचा या विषयावरचा संवाद संपविला आणि आम्ही फुडकोर्टच्या बाहेर पडलो. माझ्या उत्तर देण्याच्या स्टाईल वरून त्याला माझी चिडचिड झाली आहे हे कळण्या इतका सुज्ञ विशाल नक्कीच होता. म्हणूनच फुडकोर्ट मधून बाहेर पडताच “चल संध्याकाळी भेटू” म्हणत तो त्याच्या ऑफीसच्या दिशेने मार्गस्थ झाला.

सर्वसामान्य सिंगापूरी माणसाच्या जीवनाचे तत्वज्ञान, आपले संस्कार, आपल्याकडेही बदलत चाललेली कुटुंब पद्धती, एकटे पडत चाललेले आजी आजोबा, दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि जगण्याची लढाई… कदाचित भविष्यात आपल्याकडेही अशी फुडकोर्ट असतील… आणि तिथे आपल्या पैकी कोणाचे तरी आजी आजोबा आपले उष्टे ताट उचलतील… विचारानेच अंगावर सर्रकन काटा आला. बरं झालं आपल्याकडे फुडकोर्ट्स नाहीयेत ते…

काल रात्री पाउस पडून गेला होता.. “मामी मरियम” मधून जेऊन नेहमीच्या गल्लीतून परत येताना पावसाच्या थेंबानी वाकलेले झाड दिसले… तुझी आठवण झाली…. सवयीने एक फांदी ओढली… पानांवरून थेंबांचा सडा पडला… आणि वाटले ते झाडं काही तरी म्हणाले… मला जे ऎकू आले ते असे…

तु आलास आणि बरसून गेलास…
तुझे थेबं मी अंगाखांद्यावर लेण्यासारखे वागविले…
त्या थेंबाचे मला कधी आझे झाले नाही…
मी मोहरून गेले…
“चमचम करता मेरा नशीला बदनच्या” ठेक्यावर नाचावेसे वाटू लागले…
पण नाही… कारण मी नाचले तर तुझे थेंब ओघळून जातील…
ते तर तसेही जाणारच आहेत…
पण तु परत येई पर्यत हया थेंबातच मला तुझे प्रतिबिंब पहायचे आहे…
तुझा ओलावा अनुभवायचा आहे…

How ridiculous can it get???

Posted: April 2, 2011 in Uncategorized

How ridiculous can it get???

Upcoming Indian Model says, she will bare it all if Indian team wins the cricket world cup. She is a new generation girl and this is her way to support her country. By being nude she feels that she can excite our Indian cricket players to play even better.

Some 19 year old model is trying for publicity stunt and the whole world falling for it. She is covered in almost all new papers, channels and online media… Her facebook page is overflowing with messages and suggestions… Her twitter page is topping the tweetrends… On googletrend also she is leading the search pages…

If you look at the series of events, you will understand how smart she is…

On 21st March the news was published in Bombay Times… Immediately she published it on her facebook…
“Breaking Updates
Bombay Times
21 March issue”

Once this news was out, people were curious about this girl… they started looking out for more information about her… by then all electronic as well as print media started covering her… and she was almost everywhere…

She realized that she has to create more buzz in the online world… Next step… opened Twitter account on 25th March… Within no time she was on top tweetrends…

Justifications of her action…

“For any new Action there is always controversy and there always some fear associated with it. I think that’s just the price of being first sometimes.”

“I am a New Generaion Girl!!! Any thing for my Country to get Home the World Cup So INDIA Cheer with me That we need 1983 BACK”

“I am Ready to face all Problems for my Country to get home the World Cup, Special thanx to the Media Journalists in INDIA and World wide And India r u guys with me?? Cheer it Loud we want World Cup BACK”

She also knows how to keep the buzz alive… Immediately after India winning against Pakistan… she reiterated her “SO CALLED” promise to India.

“more 3days to go for my commitments INDIA”

With one line of comment once again she received all media attention…. Everyone started covering her again… Not only in India but newspapers in Sri Lanka, New Zealand covered her story… To bring in another angle this smart girl gave another media bite…

“My parents, and everyone else too, are very happy with my decision. Initially, they were surprised, but after that they’ve supported me fully. I am getting a great response from the country. People are supporting me so much in this endeavour; everyone’s asking me to go for it.”

Think about it how smart this girl is… Without spending a penny she is covered by media around the world!! If someone translates this in $$$ terms, it would be more than few million $ worth coverage. And for so much of free coverage and potential leap in her career in glamour world, even if she bares it all, it is a decent deal for her… But think about the social impact of such act…

Is this new definition of being BOLD or HAVING GUTS? Is this new patriotism? Is this expression of FREEDOM?

By saying “my parents are supporting me”, “my country is supporting me” is she not creating perception of she is RIGHT?

And how irresponsible our media is??… Media does not have time to cover a good work done by NGO but they have enough time and resources to cover this rubbish news… Is there something called social responsibility or our media has lost it all?

And as if all this was enough, PETA (People for the Ethical Treatment of Animals), urges to this girl saying “strip for the sake of animals instead of vowing to bare it all if India wins the World Cup”.

NOW YOU THINK… HOW RIDICULOUS CAN IT GET???

गांधींचा “स्वराज्याचा आणि सुराज्याचा” समाजवाद
नेहरूंचा “औद्योगिक क्रांतीचा” समाजवाद
सरदार पटेलांचा “सहकाराचा” समाजवाद
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा “प्रखर” राष्ट्रवाद
शास्त्रींचा “हरीत क्रांतीचा” समाजवाद
इंदिराजींचा “नॅशनलाइझ्ड” समाजवाद
राजीवचा “आधुनिक”साम्राज्यवाद
नरसिंहारावांचा “मनमोहक” साम्राज्यवाद
वाजपेयींचा “आक्रामक” उदारतावाद
आणि आता..
मनमोहनचा “भांडवशाहीचा” सोनियावाद

हे सगळेच “वाद” वादाचे मुद्दे ठरले आहेत…

हे सगळेच “वाद” फसले आहेत हे वादातित सत्य असेल
तरी ही हा देश चालला आहे…

हा देश चालला आहे कारण..
सर्वसामान्यांचा… तुमचा आमचा.. दुर्दम्य “आशावाद”…

कोणे एके काळी
जुनागढ मुक्कामी होता एक नवाब
एकदा तो भेटला एका महात्म्याला
त्या भेटीत त्याला भेट मिळाला एक चष्मा…
त्या चष्म्यातून महात्म्याने पाहिली होती स्वप्ने
नवभारताची, स्वराज्याची अन सुराज्याची

सहा दशका नंतर…
त्या महात्म्याच्या स्वप्नातला भारत
त्याच्या स्वप्नातच राहिला..
त्यांच्या स्वप्नांचा लिलाव कधीच झाला होता
आणि आता तर त्याच्या चष्म्याचाही लिलाव झाला…