काल रात्री पाउस पडून गेला होता.. “मामी मरियम” मधून जेऊन नेहमीच्या गल्लीतून परत येताना पावसाच्या थेंबानी वाकलेले झाड दिसले… तुझी आठवण झाली…. सवयीने एक फांदी ओढली… पानांवरून थेंबांचा सडा पडला… आणि वाटले ते झाडं काही तरी म्हणाले… मला जे ऎकू आले ते असे…
तु आलास आणि बरसून गेलास…
तुझे थेबं मी अंगाखांद्यावर लेण्यासारखे वागविले…
त्या थेंबाचे मला कधी आझे झाले नाही…
मी मोहरून गेले…
“चमचम करता मेरा नशीला बदनच्या” ठेक्यावर नाचावेसे वाटू लागले…
पण नाही… कारण मी नाचले तर तुझे थेंब ओघळून जातील…
ते तर तसेही जाणारच आहेत…
पण तु परत येई पर्यत हया थेंबातच मला तुझे प्रतिबिंब पहायचे आहे…
तुझा ओलावा अनुभवायचा आहे…
Advertisement
nice one