सह-अनुभूती

Posted: July 30, 2011 in कविता, मराठी, Expressions
Tags: , , , , ,

तो बाहेर… ती आत…
प्रसृतीकक्षाचा लाल दिवा पेटलेला…
तो प्रतिक्षाकक्षात अस्वस्थपणे फेर्‍या घालतोय…
काहीवेळा पुर्वीची हुरहुर आता चिंतेत परावर्तित झालेली…
तिच्या आवाजाचे, हातावर घट्ट होणार्‍या पकडीचे भास त्याला होऊ लागले…
सह-अनुभूतीच्या जाणीवेने त्यालाही आता प्रसववेदना जाणवू लागल्या…
पण याच बरोबर एक अनामिक भावना तो अनुभवत होता..
नक्की काय ते सांगता येत नव्हते… पण तरिही…

जस-जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता,
त्याच्या प्रसव-सह-अनुभूतीच्या वेदना वाढलेल्या…
त्याच बरोबर ती अनामिक भावनादेखील बळावलेली…
वाढलेल्या रक्तदाबामुळे कपाळावर घाम आला आहे की
रक्तदाब कमी झाल्यामुळे तळहात घामेजला आहे ते त्याला कळेना…
त्याच्या फेर्‍यांची गती आता वाढलेली…

आणि इतक्यात प्रसृतीकक्षाचा लाल दिवा बंद झाला..
एकाच वेळी प्राण डोळ्यात आणि कानात आणून तो दरवाजाकडे पाहू लागला…
डॉक्टर बाहेर आले… म्हणाले “अभिनंदन…………..”
आतून येणार्‍या “क्यॅह… क्यॅह…” च्या आवाजात पुढचे शब्द त्याच्या पर्यत पोहचलेच नाहीत…
कपाळावरचा आणि हाताचा घाम जाऊन डोळ्यातून दोन मोती घरंगळले…
आता त्याला त्याच्या जाणिवांची नीट ओळख होऊ लागली…

….. हं चला… बाप जन्माला आला!!!

Advertisement
Comments
  1. pallavi says:

    khup chaan lihila ahes

  2. Anand Karajgikar says:

    3 mahinya purvichi majhi gati athavli…sundar varnan kelays…mahit navhta ki tuzhyat itka changla kavi baslay.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s